Homeठाणे-मेट्रोमुंब्र्यातील जंगलाला आग ; तासाभराने आगीवर नियंत्रण

मुंब्र्यातील जंगलाला आग ; तासाभराने आगीवर नियंत्रण

ठाणे:- ठाण्यातील मामा भांचे डोंगरातील जंगलाला आग लागल्याची घटना ताजी असताना, बुधवारी मुंब्रा बायपास जवळ जंगलामध्ये आग लागल्याची घटना समोर आली. त्या आगीवर जवळपास तासाभराने नियंत्रण मिळविण्यात ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. तर सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

मुंब्रा बायपास जवळील सम्राट नगर या ठिकाणी असलेल्या जंगलाला आग लागल्याची बाब बुधवारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास समोर आली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. तसेच तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र ती आग हळूहळू पसरू लागल्याने तिच्या नियंत्रण मिळविण्यासाठी दुपारचे साडेचार वाजून गेले. यावेळी एक फायर वाहन पाचारण करण्यात आले होते अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!