Homeशहर परिसरमैत्रिणीला वाचविणे दुसऱ्या मैत्रिणीच्या जीवावर बेतले; हल्लेखोर अवघ्या दोन तासात जेरबंद

मैत्रिणीला वाचविणे दुसऱ्या मैत्रिणीच्या जीवावर बेतले; हल्लेखोर अवघ्या दोन तासात जेरबंद

दिवा: खून आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्या नागेश बाळू रुपवते याला अवघ्या दोन तासांच्या आत अटक करत तो गुन्हा उघडकीस आणण्यात मुंब्रा पोलिसांना यश आले आहे. या घटनेत नागेश याने त्याची पत्नी किरण खंदारे आणि तिची मैत्रीण ज्योती सोनकर अशा दोघींवर चाकुने हल्ला केला. यामध्ये ज्योतीचा मृत्यू झाला असून किरण ह्या जखमी असून त्यांना कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. तर मारेकऱ्याला येत्या २२ मे रोजी पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
         मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा बिट हद्दीतील पोलीस नाईक रविंद्र देसले व चालक पोलीस शिपाई पाटोळे असे पी.सी.आर-१ मोबाईलने १५ मे २०२३ रोजी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास आगासन ते दिवा परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी, त्यांना एक मुलगी जखमी अवस्थेत रस्त्याचे कडेला उभी असल्याचे निर्दशनास आली.. तिच्या जवळ जाऊन विचारणा केली असता तिने तिचे नावे किरण विठ्ठल खंदारे असे सांगुन ती तिची मैत्रीण ज्योती सोनकर हिचे सोबत पाटील टॉवर दिवा पूर्व येथे आगासल रोडवरील,पाटील टॉवरच्या रूम नं. ५११ मध्ये २ महिन्यापासून रहात आहे. साडेबाराच्या सुमारास जखमी मुलगी किरण हिचा मारेकरी पती नागेश रूपवते हा त्याचे घरी येवुन किरण हिला त्याचे सोबत नांदण्यास का येत नाही याकारणावरून तिचेशी भांडण करू लागला. त्यातच त्याने त्याच्या जवळ असलेल्या चाकुने किरण हिचे गळ्यावर, पोटावर, दोन्ही हाता- पायावर वार केले. त्यावेळी तिची मैत्रीण ज्योती ही तिला वाचविण्यासाठी मध्ये आली असता नागेश याने ज्योती हिच्या गळ्यावर, पोटावर भोसकुन व वार करून तिला गंभीर जखमी करून तो तेथून पळुन गेला असे सांगितले. जखमींना तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यावेळी ज्योती हिला तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बापुराव कोल्हटकर यांचे मार्गदर्शनाखाली मारेकरी नागेश रूपवते याचा शोध घेवून त्याला दोन तासांच्या आत अटक केली. त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिली असून येत्या २२ मे २०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. अशी माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय पवार हे करीत आहेत.

error: Content is protected !!