नगरसेविका अर्चना पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकहिताच्या कामाचा शुभारंभ
ठाणे:शिवसेनेच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विकासकामांचा धडाका सुरूच आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने आणि कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, यशोदा पाटील नगर भागातील प्रलंबित नागरी समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
स्थानिक नगरसेविका सौ. अर्चना निलेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, नगरसेवक निधीतून दोन प्रमुख गटारांच्या कामांचा भव्य शुभारंभ नुकताच करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने:
१. ठा.म.पा. शाळा क्र. ८० च्या मागच्या बाजूने साई रुद्र अपार्टमेंट, डीजी कॉम्प्लेक्स सोसायटी ते श्री कृपा बिल्डिंगपर्यंत.
२. साई निवास अपार्टमेंट ते स्टार इंग्लिश स्कूलपर्यंत.
या विकासकामांचा शुभारंभ शहरप्रमुख व माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या सहकार्याने आणि नगरसेवक बाबाजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी परिसरातील शिवसैनिक आणि रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला विभाग प्रमुख विष्णू कोटकर, मधुकर पाटील, नवनाथ पाटील, शिवाजी म्हात्रे, उपविभाग प्रमुख दिगंबर भोईर, शाखाप्रमुख अविनाश गुरव, आनंद लाखन, रमेशजी यादव, भाग्यश्री पाटील तसेच उपशाखाप्रमुख ओंकार खोत, अजय गुरव, अभय गुरव, स्वप्निल गुरव, राजू शिंदे आणि इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि परिसराचा कायापालट करणे हेच आमचे ध्येय आहे. पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली ही विकासगंगा अशीच सुरू राहील,” असा विश्वास नगरसेविका अर्चना पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.






