दिवा:- खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून व माजी महापौर नरेश मस्के यांच्या प्रयत्नाने
ठाणे महापालिका समाज विकास विभाग तर्फे धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना यंत्रसामुग्री वाटप योजनेचा शुभारंभ दिव्यात माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते पार पडला.
मंगळवारी दुपारी अवधूत हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात पात्र महिलांना यंत्रसामुग्रीचे वाटप माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते करण्यात आले.