दिवा:-बालेवाडी पुणे येथे पार पडलेल्या राष्ट्रीय एथलेटिक स्पर्धेत दिवा शहरातील कु.अथर्व अजय भोईर याने चमकदार कामगिरी करत रौप्य व कांस्य पदक पटकावली आहेत.
अथर्व भोईर यांच्या या यशामुळे ठाणे जिल्ह्यातील दिवा शहराने क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला आहे.संपूर्ण भारतातून ठाण्यासारख्या जिल्ह्याला परत एकदा मान मिळवून देण्याचे काम कु. अथर्व अजय भोईर याने केल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.अथर्व याने १०० व २०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावले असून १०० मीटर रिले धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले आहे. अथर्वच्या यशामुळे दिव्यातील नागरिक त्याचे कौतुक करत आहेत.त्याचबरोबर संपूर्ण भोईर कुटुंबियांना हा राष्ट्रीय सन्मान मिळाला असल्याची भावना कुटूंबीय व्यक्त करत आहेत.अथर्वची क्रीडा क्षेत्रातील घोडदौड आणि पदकांची लयलूट अशीच सुरू राहो अशी प्रार्थना त्याचा मित्रपरिवार करत आहे.






