Homeठाणे-मेट्रोशारदा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून नागरिकांना अपघाती विमा योजनेचे शिबिर

शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून नागरिकांना अपघाती विमा योजनेचे शिबिर

ठाण्यातील पत्रकारांना मोफत विमा काढून देणार-कृष्णा पाटील

ठाणे:-शारदा संकल्प प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 11 च्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांसाठी अपघाती विमा व सुकन्या योजना बाबतचे शिबिर राबवले जात आहे.शनिवार या शिबिराचा शेवटचा दिवस असल्याचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी सांगितले.

प्रभागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ व्हावा या उद्देशाने शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून माजी नगरसेवक कृष्णा पाटील हे विविध उपक्रम राबवत असतात.


प्रभागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ व्हावा या उद्देशाने शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून माजी नगरसेवक कृष्णा पाटील हे विविध उपक्रम राबवत असतात. याच उपक्रमाचा भाग म्हणून कृष्णा पाटील यांच्या वतीने त्यांच्या कार्यालयामध्ये भारतीय पोस्ट विभागाच्या अपघात विमा योजनेचे शिबिर राबवले जात आहे. त्याचबरोबर सुकन्या समृद्धी योजना याबाबतचे शिबिर देखील राबवले जात असून नागरिक मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेत आहेत.या शिबिरा अंतर्गत ठाण्यातील पत्रकारांना मोफत अपघाती विमा शारदा संकल्प प्रतिष्ठान मार्फत काढून देण्यात येत असल्याचे कृष्णा पाटील यांनी सांगितले.

error: Content is protected !!