दिवा:-शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे दिवा शहराच्या वतीने शिवसेना वर्धापदिनानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य कार्ड चे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शहर प्रमुख सचिन पाटील यांनी केले होते. यामध्ये एकूण १३०० नागरिकांनी लाभ घेतला. दिवा शहरात मोठ्या संख्येने मध्यम वर्गीय नागरिक राहत असून त्यांच्या निरोगी आरोग्य राहण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक कार्यकर्ते आकाश विचारे यांनी यावेळी जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे आणि युवानेते सुमित भोईर ह्यांच्या प्रमुख उस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी लोकसभा संपर्क संघटीका मृणाल यज्ञेश्र्वरी, प्रवक्ते अनिश गाढवे, युवा सेना जिल्हाधिकारी प्रतिक पाटील, उपजिल्हाप्रमुख विजय देसाई, उपजिल्हा संघटीका अंकिता पाटील, विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, कळवा-मुंब्रा विधानसभा समन्वयक विजय कदम, शिक्षक सेनेचे महाराष्ट्र राज्य उपसचिव मारुती पडळकर, युवा सेना शहरधिकारी अभिषेक ठाकूर, शहर संघटीका ज्योती पाटील, शहरसमन्वयक प्रियांका सावंत, विधानसभा समन्व्यक पंकज माळी,शहर सचिव उमेश राठोड, उपशहर संघटीका स्मिता जाधव, विभाग प्रमुख चेतन पाटील, रवी रसाळ , मार्लेश्वर पथपेढीचे साटम महाराज आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..