Homeशहर परिसरशिवसेना विभागप्रमुख उमेश भगत यांच्या हस्ते सराव परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

शिवसेना विभागप्रमुख उमेश भगत यांच्या हस्ते सराव परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

दिवा:- शिवसेना विभागप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एस.एस.सी.’ सराव परीक्षेत भाग घेण्या-या विध्यार्थांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने तसेच मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,आणि खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने दिवा शहरातील शिवसेनेच्या वतीने रमाकांत मढवी,दिवा शहर प्रमुख तथा माजी ठा.म.पा.उपमहापौर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली एस.एस.सी.2024 ची सराव परिक्षा’ घेण्यात आली होती.
सदर परिक्षेत ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहेत त्यांचा दिव्यातील आपपल्या विभागात सत्कार करण्यात आला.त्याच पार्श्वभुमीवर मंगळवार दि.20/02/2024 रोजी,आकांक्षा मंगल कार्यालय,आगसन रोड,आकांक्षा नगर दिवा (पूर्व) याठिकाणी उमेश अशोक भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एस.एस.सी.सराव परीक्षेत’भाग घेणा-या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विशेष म्हमजे,कु.तनिशा गायकर या विद्यार्थ्यानीला सराव परीक्षेत 89% गुण मिळाल्याबद्दल उमेश भगत यांच्या हस्ते सन्मान चिन्ह’ देऊन, सत्कार करण्यात आला.तर भगत यांचे सहकारी सूर्यकांत कदम (शिवसेना,दिवा पूर्व, उपविभाग प्रमुख),रविंद्र परब (शाखाप्रमुख),सतिश निकम (शाखाप्रमुख),नरेंद्र पाटील (शाखाप्रमुख),संतोष पेंढारी (शाखाप्रमुख),विशाखाताई इंदुलकर (महिला शाखा संघटक) या पदाधिका-यांच्या हस्तेहि विद्यार्थ्यांचा प्रमाण पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सराव परीक्षे दरम्यान विद्यार्थ्यांची कसलीही गैरसोय होऊ नये याची पुरेपूर काळजी घेणारे सचिन रोकडे(शिवसेना,दिवा पूर्व मध्यवर्ती कार्यालय प्रमुख),सागर पवार, प्रतिक आयरे,अक्षय आडवळकर या कार्यकर्त्यांचाही उमेश भगत यांच्याहस्ते प्रोत्साहनपर प्रमाण पत्र देऊन,सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सखाराम गोगावले,अवधूत पाटील, राकेश चव्हाण, सुजल पवार इत्यादि कार्यकत्यांनी परिश्रम केले.

error: Content is protected !!