Homeठाणे-मेट्रोशिवसेनेच्या नांदेड लोकसभा संपर्कप्रमुखपदी रमाकांत मढवी यांची नियुक्ती

शिवसेनेच्या नांदेड लोकसभा संपर्कप्रमुखपदी रमाकांत मढवी यांची नियुक्ती

मुंबई:शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या संघटनात्मक रचनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, ठाणे महापालिकेचे जेष्ठ नगरसेवक रमाकांत मढवी यांची ‘नांदेड लोकसभा संपर्कप्रमुख’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने ही निवड जाहीर करण्यात आली.
या नव्या नियुक्तीमुळे नांदेड लोकसभा मतदारसंघातील पक्षाची बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मढवी यांच्यावर विश्वास दर्शवत ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. या निवडीबद्दल शिवसेना पक्षाच्या वतीने रमाकांत मढवी यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या नियुक्तीमुळे नांदेडमधील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळातील पक्षाच्या विस्तारासाठी ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

error: Content is protected !!