Homeशहर परिसरशिवसेनेच्या वतीने दिव्यातील गणेश भक्तांना गावी जाण्यासाठी मोफत बस सेवा,रमाकांत मढवी यांच्या...

शिवसेनेच्या वतीने दिव्यातील गणेश भक्तांना गावी जाण्यासाठी मोफत बस सेवा,रमाकांत मढवी यांच्या हस्ते मोफत बसेसचे पास वितरित

दिवा:-दिव्यातून गणेशोत्सव साठी गावी जाणाऱ्यांना मोफत बसेस उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेने पुढाकार घेतला असून मोफत बसेस साठीचे पास माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या उपस्थितीत रविवारी नागरिकांना देण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या तर्फे दिवा विभागातून गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना
मोफत एस टी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिवा विभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एकूण ८० बसेस देण्यात आल्या आहेत.रविवारी शिवसेना दिवा शहर प्रमुख,माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये गणेशोत्सव साठी गावी जाणाऱ्या नागरिकांना मोफत बसेस चे पास उपलब्ध करून देण्यात आले.यावेळी विभाग प्रमुख उमेश भगत,भालचंद्र भगत,माजी नगरसेवक अमर पाटील,दीपक जाधव,आदेश भगत,विनोद मढवी,दर्शना म्हात्रे,दीपाली भगत,अर्चना पाटील आदी मान्यवरांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.दिव्यातून गणेशोत्सव साठी बसेस उपलब्ध करून दिल्याने नागरिकांनी मुख्यमंत्री व खासदार यांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!