दिवा:- दिवा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शुक्रवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
उसरघर रेल्वे कलव्हर्ट जवळील पलावा सिटी भागातील पाईपलाईन मोठ्या प्रमाणात गळती असल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात दिवा शहरातील पाणीपुरवठा आठ तासांसाठी बंद राहणार असून सदर दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती मिळत आहे.






