दिवा:-शिवसेनेचे दिव्यातील उपशहर प्रमुख व माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या नावे इंस्टाग्राम वर बनावट अकाउंट उघडून चुकीचा वापर केला जात असल्याची तक्रार शैलेश पाटील यांनी मुंब्रा पोलिसांकडे केली आहे.
Shaileshpatil7000 या नावाने माजी नगरसेवक शैलेश पाटील यांचे इंस्टाग्राम वर अधिकृत खाते असून या खात्याचे अनेक फॉलोवर्स आहेत.मात्र शैलेश पाटील यांच्या नावे Shailesh_patil7000 असे बनावट खाते उघडून व त्यांचा फोटो वापरून इंस्टाग्राम वर दुसरे खाते उघडण्यात आले आहे. या अज्ञात इसमाने या खात्याद्वारे चुकीचा वापर सुरू केल्याची तक्रार शैलेश पाटील यांनी केली आहे. सदर बनावट इंस्टाग्राम खाते अज्ञात व्यक्ती चालू बंद करत असून सदर व्यक्तीवर सायबर पोलिसांच्या मदतीने कठोर कारवाई करावी व सदर खाते बंद करावे अशी मागणी माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी मुंब्रा पोलिसांकडे केली आहे.






