Homeठाणे-मेट्रोसंगमेश्वर रेल्वेस्थानकात उद्यापासून 'नेत्रावती एक्सप्रेस' थांबणार

संगमेश्वर रेल्वेस्थानकात उद्यापासून ‘नेत्रावती एक्सप्रेस’ थांबणार

मुंबई:-कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने संगमेश्वर रेल्वेस्थानक येथे प्रायोगिक तत्वावर थांबा मंजुर केल्यानंतर ही एक्स्प्रेस उद्यापासून म्हणजेच मंगळवारपासून संगमेश्वर रेल्वेस्थानकात थांबणार आहे.

कोकण रेल्वेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे नेत्रावती एक्स्प्रेस संगमेश्वर स्थानकात थांबणार असल्याची माहिती दिली आहे. मुंबईहून तिरुअनंतपुरमला जाणारी १६३४५ ही गाडी सकाळी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन सकाळी ११-४० ला सुटेल १२-०५ ला ठाण्याहुन १२-५० ला पनवेलहुन सुटुन संगमेश्वरला संध्याकाळी ५-३४ वा पोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (१६३४६) सकाळी ९-५८ ला संगमेश्वरहुन सुटेल.

गेले अनेक वर्ष मागणी केल्यानंतर अखेर आज नेत्रावती एक्सप्रेसला संगमेश्वरला थांबा देण्यात आला.

error: Content is protected !!