दिवा:- दिवा शिवसेनेच्या युवती सेना शहर अधिकारी साक्षी रमाकांत मढवी यांच्या वतीने भव्य किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.गडकिल्ल्यांचे संवर्धन व ऐतिहासिक वास्तूंचे जतन हा संकल्प डोळ्यासमोर ठेवून साक्षी मढवी यांनी सदर स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेत प्रथम सात क्रमांकासाठी आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आली आहेत.प्रथम क्रमांक 11 हजार 111, द्वितीय क्रमांक 7 हजार 777, तृतीय क्रमांक 5 हजार 555 अशी पहिल्या तीन क्रमांकाची बक्षिसे आहेत. या स्पर्धे दरम्यान भाग घेतलेल्या स्पर्धकांच्या किल्ल्यांची पाहणी 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक साक्षी मढवी यांनी दिली आहे.