Homeशहर परिसरसाबे गाव व दातीवली गाव येथे नवीन आरोग्य केंद्र होणार

साबे गाव व दातीवली गाव येथे नवीन आरोग्य केंद्र होणार

मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते भूमिपूजन

दिवा:- मातोश्री नगर, गणेश पाडा येथील आरोग्य केंद्र व हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांना दिवेकरांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता दिवा शहरात आणखी दोन नवीन आरोग्य केंद्र खुले होणार आहेत. त्यामुळे दिवेकरांच्या आरोग्याची परवड आता आणखी कमी होणार आहे.

प्रभाग क्रमांक २७ मधील साबे गाव, ठामपा शाळेजवळ नवीन आरोग्य केंद्राच्या कामाचं व दातीवली गावातील आरोग्य केंद्राच्या कामाचं भूमिपूजन आज शिवसेना शहरप्रमुख, मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते पार पडलं.
यावेळी प्रभाग क्रमांक २७ येथे शिवसेना नगरसेवक शैलेश पाटील, अमर पाटील, उपशहरप्रमुख अँड.आदेश भगत, विभाग प्रमुख निलेश पाटील, गुरुनाथ पाटील, भालचंद्र भगत, उपविभाग प्रमुख, धीरज पाटील, संतोष हळदणकर, शाखाप्रमुख दिगंबर भोईर, महेश पाटील, शैलेश पाटील, अविनाश गुरव, आनंद लाखन, निरंजन चुडनाईक, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक २८ मध्ये झालेल्या भूमीपीजन कार्यक्रमात परिसरातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!