Homeशहर परिसरसामाजिक कार्यकर्ते कैलेश पाटील यांच्या वतीने मोफत छत्री वाटप

सामाजिक कार्यकर्ते कैलेश पाटील यांच्या वतीने मोफत छत्री वाटप

दिवा:-दिवा विकास प्रतिष्ठान व श्री दत्तकृपा मित्र मंडळ यांच्या वतीने मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते कैलेश पाटील यांनी केले होते.रविवारी सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम मुंब्रादेवी कॉलनी येथे पार पडला. परिसरातील गरजू नागरिकांना हे छत्री वाटप करण्यात आल्याची माहिती कैलेश पाटील यांनी दिली. दरवर्षी कार्यसम्राट माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून व श्री दत्तकृपा मित्र मंडळाच्या सहकार्याने सामाजिक कार्यकर्ते कैलेश पाटील हे सर्वसामान्य नागरिकांना छत्री वाटप करत असतात. यावेळी हा कार्यक्रम रविवारी पार पडला.

error: Content is protected !!