दिव्यातील शिवसैनिकांकडून अभिनंदन
दिवा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दिवा शहर संघटिका सौ. ज्योतीताई राजकांत पाटील यांची पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भिवंडी ग्रामीण व शहापूर संपर्क संघटिका म्हणून नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीनिमित्त दिवा शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी उपशहर प्रमुख मारुती पडळकर, सर विभाग प्रमुख योगेश निकम, विभाग प्रमुख संजय जाधव, विभाग प्रमुख रवी रसाळ, उपविभाग प्रमुख अजित माने, उपविभाग प्रमुख संजय निकम, संदीप राऊत, धनाजी पवार, सचिन केसरकर, प्रवीण उत्तेकर, गजानन शेलार, अशोक अमोणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






