Homeशहर परिसरडोंबिवलीत नर्सला मारहाण; ठाकरे गटाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांच्याकडून...

डोंबिवलीत नर्सला मारहाण; ठाकरे गटाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांच्याकडून मारहाण करणाऱ्यांचा निषेध

दिवा:कल्याण-डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या एका महिला नर्सवर शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाने हात उचलल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत.सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती राजकांत पाटील यांनी याबाबत सोशल मीडियावर आपली भूमिका मांडत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ” घडलेला हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. महिला परिचारिकेवर हात उचलणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या कृतीवरून शिवसेना शिंदे गटाची महिलांप्रती असणारी भूमिका आणि सत्तेचा माज स्पष्टपणे दिसून येतो,” असा घणाघात ज्योती पाटील यांनी केला.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री महोदयांनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा बेलगाम राजकारण्यांना वेळीच आळा घालावा “अशी मागणी ज्योती पाटील यांनी केली आहे.

error: Content is protected !!