Homeशहर परिसरदिल्ली | भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वाढदिवसानिमित्त शिवाजी आव्हाड यांच्याकडून...

दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वाढदिवसानिमित्त शिवाजी आव्हाड यांच्याकडून शुभेच्छा

दिल्ली:- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभा खासदार विनोद तावडे यांची दिल्लीतील निवासस्थानी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस (भटके विमुक्त आघाडी) शिवाजी आव्हाड यांनी सदिच्छा भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार हेही उपस्थित होते.

या प्रसंगी शिवाजी आव्हाड यांनी विनोद तावडे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर यशासाठी शुभेच्छा देत, त्यांच्या नेतृत्वातून देशसेवा आणि संघटनकार्य अधिक बळकट होत राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

error: Content is protected !!