दिवा : दिवा शहरातील महिलांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही नगरसेवक शैलेश पाटील यांच्या कार्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला. यावेळी शहरातील शेकडो महिलांनी शैलेश पाटील यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात शैलेश पाटील हे ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याने त्यांच्याबद्दल महिलांनी आपुलकीची भावना व्यक्त केली. तसेच शैलेश पाटील यांना दीर्घायुष्य लाभावे आणि नागरिकांच्या सेवेसाठी त्यांना सदैव बळ मिळावे, अशी भावना महिलांनी यावेळी व्यक्त केली.






