दिवा : बेतवडे येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी मॅरेथॉन बांधकाम व्यावसायिकाविरोधात सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांना जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधत, संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून ज्या शेतकऱ्यांना त्रास झाला आहे किंवा ज्यांची फसवणूक झाली आहे, अशा शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, दिव्यातील सर्वसामान्य जनता या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे असे ही ज्योती पाटील म्हणाल्या.






