Homeशहर परिसरशिवसेना-युवतीसेना दिवा शहरातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा 'गुणगौरव सोहळा' उत्साहात संपन्न!

शिवसेना-युवतीसेना दिवा शहरातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा’ उत्साहात संपन्न!

दिवा:शिवसेना व युवतीसेना दिवा शहर यांच्या वतीने आयोजित, दहावी-बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य ‘गुणगौरव सोहळा’ शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी सेंट मेरी स्कूल हॉल, दिवा (पूर्व) येथे उत्साहात पार पडला. यावेळी शहर प्रमुख रमाकांत मढवी, उपशहर प्रमुख आदेश भगत, नगरसेविका साक्षी मढवी यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘शिक्षणातून समृद्धीकडे’ हे ध्येय ठेवून स्थानिक नगरसेविका तथा युवतीसेना शहर अधिकारी कु. साक्षी रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा रंगला. याप्रसंगी परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शिवसेना व युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला नगरसेवक दीपक जाधव, विभाग प्रमुख भालचंद्र भगत यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!