Homeशहर परिसरशैलेश पाटील यांच्या आश्वासनानंतर सुवर्णा कांबळे व सौरव अदांगळे यांचे उपोषण मागे

शैलेश पाटील यांच्या आश्वासनानंतर सुवर्णा कांबळे व सौरव अदांगळे यांचे उपोषण मागे

दिवा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिवा शहरात व्हावा यासाठी उपोषणासाठी बसलेल्या सुवर्णा कांबळे व सौरव अदांगळे यांची नगरसेवक शैलेश पाटील यांनी सोमवारी भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिवा शहरात उभा राहण्यासाठी आपण पालिका स्तरावर पाठपुरावा करू असे लेखी आश्वासन शैलेश पाटील यांनी दिले. त्याचबरोबर शैलेश पाटील यांनी आमदार राजेश मोरे यांच्याशी फोनवरून बोलणे करून याबाबत पाठपुरावा करण्यासंदर्भात उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले. शैलेश पाटील यांच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी विभाग प्रमुख भालचंद्र भगत देखील उपस्थित होते.

error: Content is protected !!