Homeशहर परिसरदिव्यात रास गरबा रद्द करून सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करण्याचा नगरसेवक शैलेश पाटील...

दिव्यात रास गरबा रद्द करून सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करण्याचा नगरसेवक शैलेश पाटील यांचा निर्णय

दिवा : दिवा शहरातील नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या वतीने, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे मित्र मंडळ आणि दिवा विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून यंदा दिव्यात आयोजित करण्यात येणारा रास गरबा २०२६ रद्द करून त्यासाठी होणारा खर्च सामाजिक कार्यासाठी वापरण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

प्रभाग क्रमांक 27 चे नगरसेवक शैलेश पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.गरजू नागरिकांना आर्थिक मदत, गरजू विद्यार्थ्यांना शालेय फी व शैक्षणिक सहाय्य, गरजू रुग्णांना औषधोपचार व ऑपरेशनच्या खर्चासाठी मदत तसेच रुग्णालयातील बिल भरण्यासाठी सहाय्य करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. तसेच रोजगार नसलेल्या गरजू व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या निर्णयातून उत्सवाचा खर्च सामाजिक गरजांसाठी वळविण्याचा संदेश देण्यात आला आहे.

error: Content is protected !!