Homeशहर परिसरमनसे कडून दिवा शहरासाठी नव्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर

मनसे कडून दिवा शहरासाठी नव्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर

दिवा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी दिवा शहरातील नवीन पदाधिकार्‍यांच्या अधिकृत नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. १६ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पत्राद्वारे या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांना विविध जबाबदार्‍या सोपवण्यात आल्या आहेत.

या नव्या नियुक्त्यांमध्ये श्रीमती अंकिता घाग (कदम) यांची ‘शहर अध्यक्षा महिला सेना’ म्हणून तर श्री. परेश भास्कर पाटील आणि श्री. संतोष नारायण पाटील यांची ‘शहर सचिव’ म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय देवेंद्र भगत आणि किरण दळवी यांच्यावर ‘उपशहर अध्यक्ष’ पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच विविध प्रभाग अध्यक्षांची आणि सचिवांचीही घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये देवदत्त घाडी, शैलेंद्र कदम, जयेश घरत, भानुदास पाटील, सुशांत पोस्टतांडेल आणि प्रेम पाटील यांचा समावेश आहे. महिला सेनेमध्ये मयुरी पोरजी, नम्रता खराडे आणि शितल पाटील यांनाही महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत.

राज ठाकरे यांनी नवनियुक्त पदाधिकार्‍यांना कडक शब्दांत सूचना दिल्या आहेत की, पक्षाची ध्येय-धोरणे निष्ठापूर्वक राबवावीत आणि कामात कोणतीही कुचराई किंवा तडजोड खपवून घेतली जाणार नाही. सर्व नियुक्त्या १ वर्षाच्या कालावधीसाठी असून, कार्य अहवाल पाहूनच पुढील मुदतवाढीचा निर्णय घेतला जाईल, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांनी सर्व पदाधिकार्‍यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!