Homeठाणे-मेट्रोमुंब्रा रेतीबंदर चौपाटीचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात

मुंब्रा रेतीबंदर चौपाटीचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून पाहणी; उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना

मुंब्रा : मुंब्रा येथील रेतीबंदर चौपाटीच्या सुशोभीकरणाचे काम सध्या सुरू असून, प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. नागरिकांना समुद्रकिनारी फिरता यावे, कुटुंबीयांसोबत वेळ घालवता यावा आणि विरंगुळ्यासाठी सार्वजनिक जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने चौपाटीचा विकास करण्यात येत आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रेतीबंदर चौपाटीवरील सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. उर्वरित कामेही जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांना दिल्या.

चौपाटीचा विकास पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना किनारी फिरण्यासाठी तसेच कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी सार्वजनिक विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पाहणीदरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काही युवा खेळाडूंसोबत व्हॉलीबॉल खेळण्याचाही आनंद घेतला. यामुळे पाहणीदरम्यान काही काळ उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या वेळी खासदार नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक रमाकांत मढवी, युवासेना जिल्हाध्यक्ष जितेन पाटील, माजी नगरसेवक बालाजी काकडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!