Homeशहर परिसरविद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दिवा बंदला संमिश्र प्रतिसाद; वंचितचे आंदोलन

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दिवा बंदला संमिश्र प्रतिसाद; वंचितचे आंदोलन

दिवा: दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला दिव्यातील दुकानदारांनी संमिश्र प्रतिसाद दिला. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिवा येथे आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात, अशी मागणी वंचितचे विकास इंगळे यांनी केली. आंदोलनात कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

error: Content is protected !!