दिवा : दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनी परिसरातील हरिश्चंद्र अपार्टमेंट, बिल्डिंग क्रमांक ४ मधील रूम क्रमांक १०९ येथे दिनेश जैस्वाल यांच्या घरात सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने आगीची घटना घडली होती.या दुर्घटनेत घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांनी दिनेश जैस्वाल यांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. तसेच जैस्वाल कुटुंबीयांची विचारपूस करून त्यांना आवश्यक ती मदत करण्यात आली. या प्रसंगी संकटाच्या काळात कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका शैलेश पाटील यांनी घेतली.
यावेळी किरण जाधव, प्रदीप पाटील, राजा भंडारी, रमेश कडवेकर, मंगेश सकपाळ, आदित्य कदम, समीर भारद्वाज, पप्पू साळवी, विजय जैस्वाल, अशोक कदम, सुनील लांजेकर, गिरीश सुरे, आकाश वाळवेकर, आकाश दिवाळे, कृष्णा जैस्वाल, संदीप बाईत, मनीषा सोनवणे आदी गुरुदर्शन नगरमधील कार्यकर्ते उपस्थित होते.






