Homeठाणे-मेट्रोपत्रकार भवनाशेजारील तीन मजली बेकायदा इमारत तोडण्यास सुरुवात

पत्रकार भवनाशेजारील तीन मजली बेकायदा इमारत तोडण्यास सुरुवात

ठाणे: ठाण्याच्या गावदेवी येथील पत्रकार भवनाशेजारी ठेकेदार राजन शर्मा यांनी उभारण्यात आलेली अनधिकृत इमारत धोकादायक असल्याने तसेच शासनाने सदरचा भूखंड ताब्यात घेतल्यामुळे सदरची इमारत तोडण्याची कारवाई आज सुरू करण्यात आली गेल्या वर्षी पत्रकार भवनाची वास्तू जमीन दोस्त करण्यात आली होती         

     शासनाने ठाणे जिल्हा पत्रकार संघाला गावदेवी येथील सदरचा भूखंड पत्रकार भवन बांधण्यासाठी दिला होता तत्कालीन कार्यकारणी सदस्यांनी बेकायदेशीर करारनामा करून शासनाची कोणतीही परवानगी न घेता पत्रकार भवन उभारण्यात आले होते सदर उभारणारा ठेकेदार राजन शर्मा यांनी पत्रकार भवना व्यतिरिक्त अजून एक बेकायदा तीन माळ्याची इमारत उभारली असता सदर प्रकरणी शासनाने शर्ती भंगाची कारवाई सुरू केली असता ठेकेदार राजन शर्मा याने न्यायालयात स्थगिती घेतली मात्र तत्कालीन कार्यकारणी, प्रशासन यांनी सदरची स्थगिती उठवण्याचा कोणताही प्रयत्न न केल्यामुळे गेले पंचवीस वर्षे या दोन्ही इमारतींचा ताबा ठेकेदार राजन शर्मा यांच्याकडेच होता तो या दोन्ही इमारतींचा गैरवापर करून यातील काही गाळे भाड्याने देऊन काही गाळे विक्री करून शासनासह पत्रकारांची फसवणूक केली असताना तत्कालीन कार्यकारिणीने त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला .त्यामुळे पत्रकारांसाठी राखीव असलेल्या या भूखंडाचा वापर गेल्या २५ वर्षात पत्रकारांसाठी झालाच नाही.

     सदरची बाब शासनाच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे आज बारा वर्षाच्या प्रदीर्घ पाठपुराव्यामुळे ठाण्याचे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी सदरचा भूखंड शासनाच्या ताब्यात घेण्याचा आदेश ३ ऑगस्ट २०२२ रोजी काढला सदर जागेवरील इमारत तात्काळ निष्काषित करण्यात यावी तसेच रिकाम्या झालेल्या या भूखंडाला तारेचे कंपाउंड करून सदरची जागा शासनाच्या ताब्यात असल्याचा बोर्ड तहसीलदार यांनी त्वरित लावा असा आदेश दिला त्यानुसार सोमवारी सकाळपासून पत्रकार भवन शेजारील तळ अधिक तीन मजल्याची बेकायदा इमारत तोडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे

सदरची कारवाई पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आली असून तहसीलदार कार्यालयाने ठाणे महानगरपालिकेला दिलेल्या आदेशानुसार पालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सुरू करण्यात आली यावेळी सर्कल ऑफिसर मंडळ अधिकारी पाटील तसेच पालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!