Homeठाणे-मेट्रोखड्ड्यामुळे तरूणाचा मृत्यू,कोट्यावधी रूपये खर्च करूनही रस्त्यांवर खड्डे

खड्ड्यामुळे तरूणाचा मृत्यू,कोट्यावधी रूपये खर्च करूनही रस्त्यांवर खड्डे

संतप्त मनसेने नगर अभियतांना दिली कुंभकर्णाची प्रतिमा देत आंदोलन

ठाणे:गेल्या सहा वर्षातील रस्त्यांवर केला गेलेला १३०० कोटींचा खर्च असो किंवा गेल्या दोन महिन्यांपासून १८३ कोटीच्या रखडलेल्या कामामुळे रविवारी कोपरी परिसरात असलेल्या खड्ड्यामुळे मृत्यू झाला. ठाण्यातील खड्ड्यामुळे अनेक तरूणांचा जीव जाऊनही प्रशासन मात्र कुंभकर्णासारखी झोपलेली आहे. ठाणेकरांना सहन कराव्या लागणाऱ्या या त्रासविरोधात सोमवारी मनसेचे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे आणि मनसेचे जनहित विधी विभागचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंदरकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ठाणे महापालिका नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांना कुंभकर्णाची प्रतिमा देत आंदेालन करण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून मनसेच्या वतीने ठाण्यातील खराब रस्त्यांबाबत आवाज उठविला जात आहे.  प्रशासनाला निवेदन दिले असून प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे रविवारी आणखी एका २७ वर्षाच्या तरूणाचा कोपरी येथे खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली अजून किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे? असा संतप्त सवाल मनसेच्या वतीने ठाणे महापालिकेला केला जात आहे. एकीकडे स्मार्ट सिटीसाठी पुरस्कार मिळाले जात असताना मात्र दुसरीकडे ठाण्यातील खराब रस्त्यामुळे लोकांचा जीव जात आहे.

* १८३ कोटी निधी येऊनही रस्त्याचे काम रखडलेले

ठाण्यातील रस्त्यांची अवस्था सुधारावी, यासाठी नगर विकास विभागाच्या वतीने ठाणे महापालिकेला १८३ कोटींचा निधी देण्यात आला आहे. या निधी अंतर्गत ठाण्यातील महत्त्वांच्या रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले. या निधी अंतर्गत ठाण्यातील महत्त्वांच्या रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले. यामध्ये सिमेंट काँक्रिट, डांबरीकरण आणि यु टी डब्लू टी पद्धतीने रस्ते करण्याच्या अनुषंगाने निविदा काढण्यात आल्या. ठाण्यातील १२७ रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेले आहे.

रस्त्यांवर ६ वर्षात १३०० कोटी खर्च

गेल्या सहा वर्षांमध्ये ठाणे महापालिकेने रस्त्यांवर १ हजार ३२१ कोटी रूपये खर्च केला आहे. ठाणे महापालिकेकडून रस्त्यांवर अमाप खर्च होत असतानाही दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे लोकांचा बळी जात आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आज ठाणेकर आपला जीव गमवत आहेत.

” कोपरी पुलाचा रस्ता एमएमआरडीएच्या अखत्यारीत असून त्यांना खड्डे बुजविण्याच्या सूचना सातत्याने देण्यात येत आहेत. त्याच इतर प्राधिकरणालाही खड्डे बुजविण्याच्या सूचना देण्यात येतात. दिवा आगमन भागात १६०० मीटर काँक्रीटचा रस्ता तयार करण्याचे काम सुरू असून जमीन वादामुळे ४०० मीटर रस्त्याचे काम रखडले आहेत. याच भागात अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. असे अपघात होऊ नये म्हणून शहरातील रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे निरंतर सुरू आहे.”- प्रशांत सोनाग्रा, नगर अभियंता, ठामपा.

error: Content is protected !!