Homeठाणे-मेट्रोजखमी बगळ्याला जीवनदान

जखमी बगळ्याला जीवनदान

ठाणे: येथील कोपरी पूर्वेतील चेंदणी कोळीवाडा बंदरावरील विसर्जन घाट या खाडी किनाऱ्यावर जखमीवस्थेत बुधवारी सकाळी आढळून आलेल्या एका बगळ्याला ठाणे महापालिका कर्मचारी तथा पक्षीमित्र भरत मोरे यांनी जीवदान दिले. मोरे यांनी त्या जखमी बगळ्याला तातडीने पकडून उपचारार्थ दाखल केले आहे. त्या बगळ्याच्या पंखाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला नीट उडताही येत नव्हते. असे ही मोरे यांनी बोलताना सांगितले.

error: Content is protected !!