Homeशहर परिसरभाजपचे कृष्णा पाटील यांच्या वतीने सेवा पंधरवड्या निमित्ताने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

भाजपचे कृष्णा पाटील यांच्या वतीने सेवा पंधरवड्या निमित्ताने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

ठाणे:-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन मा. नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
हे शिबिर रविवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत कृष्णा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यलयात पार पडणार आहे. या शिबिराच्या आयोजनासाठी शारदा संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्यासह माजी नगरसेविका नंदा पाटील व समाजसेवक सचिन पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.या शिबिराअंतर्गत नाक,कान, घसा व तोंडाचा कॅन्सर याबाबत तपासणी होणार असून तज्ञ डॉक्टर डॉ.राहुल कुलकर्णी हे रुग्णांची तपासणी करणार आहेत.या शिबिरासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.पूर्व नोंदणी साठी 7045016498 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.या शिबिरासाठी नाना पालकर स्मृती समिती,ठाणे शाखा,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वृंदावन उपनगर व भाजपा वैद्यकीय आघाडी ठाणे शहर यांचे सहकार्य लाभले आहे.

error: Content is protected !!