Homeशहर परिसरज्योती पाटील आयोजित उत्कृष्ट खाद्य पदार्थ स्पर्धेला दिव्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्योती पाटील आयोजित उत्कृष्ट खाद्य पदार्थ स्पर्धेला दिव्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दिवा:-भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व तन्वी फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित नवरात्र निमित्त महिलांसाठी विशेष उत्कृष्ट खाद्यपदार्थ स्पर्धा ज्योती पाटील यांनी आयोजित केली होती. या स्पर्धेत शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
दिवा शहरातील महिलांच्या पाककला विषयक कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्ष ज्योती पाटील यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भटकविमुक्त आघाडी सेलचे शिवाजी आव्हाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलांनी घरून बनवून आणलेल्या खाद्य पदार्थांचे परीक्षकांनी परीक्षण केल्यानंतर क्रमांक काढण्यात आले. उत्कृष्ट पदार्थ बनवणाऱ्या महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य विजय भोईर,भाजपा शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे, दिवा शहर सरचिटणीस समीर चव्हाण,युवराज यादव,माजी मंडळ अध्यक्ष सुधीर म्हात्रे, प्रवीण पाटील,भाजप व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर, डॉक्टर विद्यासागर दुबे, याचबरोबर आयोजक येथे ज्योती पाटील, सौ संगीता भोईर, निर्मला भोईर, अलका म्हात्रे, सौ श्रेया परब, उज्वला चव्हाण,कोमल सावंत, अनिता तांबे आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात विजेता ठरलेल्या महिलांना बक्षीस सोन्याची अंगठी, मानाची पैठणी, डिनर सेट पाच किलो सिटलचा डबा व घरगुती लागणार रेशन सामान देण्यात आले.
या स्पर्धेत खालील महिला विजेत्या ठरल्या, रिया मोरे, मनीषा परब, अर्पणा पाटील, मयुरी बेलनेकर, वैभवी गुळेकर, रश्मी मिस्त्री, सुमिता कोठारी, प्रणाली नाईक, शुभ्रा बने, करुणा म्हात्रे, सुनीता राजभर, अनिता लंगडे,सुषमा बुबेरा,मंगल सकटे.

error: Content is protected !!