Homeठाणे-मेट्रोमुख्यमंत्र्यांचे दिवावासीयांना मोठे गिफ्ट,दिव्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची घोषणा! पाच कोटींची तरतूद

मुख्यमंत्र्यांचे दिवावासीयांना मोठे गिफ्ट,दिव्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची घोषणा! पाच कोटींची तरतूद

सुहास खंडागळे

दिवा:- मागील अनेक वर्षांची दिवा शहरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन होण्याची येथील नागरिकांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मंजूर करत दिव्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याची घोषणा केली.या पोलीस ठाण्यासाठी पाच कोटीच्या निधीची तरतूद केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवा येथील सभेत जाहीर केले.

दिवा शहरातील नागरिकांना पोलिसात दाद मागण्यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यासाठी अनेक वेळेला येथील नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी मुंब्रा येथे जावे लागत असते. परिणामी येथील सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन येथील नागरिकांनी अनेक वर्षांपासून दिवा शहरात स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे ही मागणी लावून धरली होती. या मागणीचा पाठपुरावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी वारंवार केला होता. अखेर स्वतंत्र पोलीस ठाण्याची ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवा येथील जाहीर सभेत मान्य करत दिवा पोलीस स्टेशन साठी पाच कोटी निधीची घोषणा केली. त्याचबरोबर पालिका आयुक्तांना योग्य त्या जागेची तातडीने पाहणी करून यासंबंधीतील पोलीस स्टेशन उभारणीची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देशही या सभेत दिले.

दिवा येथे विविध विकास कामांच्या लोकार्पणाचा सोहळा शिवसेनेमार्फत आयोजित करण्यात आला होता.यावेळी दिवा शहरातील नवीन जलवाहिनी, आगरी कोळी भवन, दिवा आगासन रस्त्याचे लोकार्पण, त्याचबरोबर शहरात झालेल्या विविध काँक्रीट रस्त्यांचे लोकार्पण, देसाई आगासन खाडी ब्रिजचे भूमिपूजन, यासह अन्य रस्ते विकास अशा विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील महत्वपूर्ण घोषणा केली.यावेळी खासदार श्रीकांत शिंदे,जिल्हाधिकारी,पालिका आयुक्त, माजी महापौर नरेश मस्के,माजी उपमहापौर रमाकांत मढवी,माजी नगरसेवक शैलेश पाटील यांसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!