Homeशहर परिसरमुख्यमंत्र्यांच्या दिव्यातील सभेला गालबोट,शॉक लागून एकाचा दुर्दैवी मृत्यू

मुख्यमंत्र्यांच्या दिव्यातील सभेला गालबोट,शॉक लागून एकाचा दुर्दैवी मृत्यू

दिवा:- बुधवारी दिवा येथे आयोजित मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेदरम्यान रामजीयावन विश्वकर्मा (वय 55) या व्यक्तीला मोकळ्या विद्युत तारेचा झटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

सदर दुर्घटना घडल्यानंतर विश्वकर्मा यांना त्यांच्या मुलाने त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं.मात्र रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले.

दिवा इथं आयोजित केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. या सभेला दिव्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचं भाषण सुरू असतानाच स्टेज पासून जवळच ही दुर्दैवी घटना घडली.

खासदार शिंदे यांनी त्वरित विद्युत पुरवठा बंद करण्याची सूचना आयोजकांना दिली. तसेच गर्दी खूप असून नागरिकांना गोंधळ न करण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांनी आपलं भाषण आटोपतं घेत घटनास्थळी धाव घेतली.विश्वकर्मा यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

error: Content is protected !!