Homeशहर परिसरठाकरेंच्या शिवसेनेकडून दिव्यात मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन

ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिव्यात मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन

दिवा:- ठाकरेंच्या शिवसेनेने दिव्यात लोकहिताचे उपक्रम राबवण्यावर भर दिला असून याचाच भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रविवारी सुमित हॉल येथे मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्पन्नाचा दाखला, वय, राष्ट्रीयत्व अधिवास दाखला, ज्येष्ठ नागरिकांचा दाखला, स्थानिक वास्तव्याचा दाखला आदी दाखले या शिबिरात नागरिकांना मोफत काढून दिले जाणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिवा शहर विभागाकडून करण्यात आले असून अधिक माहितीसाठी उपशहर प्रमुख सचिन पाटील,अभिषेक ठाकूर,गुरुनाथ नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. दिवा पूर्वेकडील मयूर हॉटेल समोरील सुमित हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!