दिवा:- ठाकरेंच्या शिवसेनेने दिव्यात लोकहिताचे उपक्रम राबवण्यावर भर दिला असून याचाच भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रविवारी सुमित हॉल येथे मोफत दाखले वाटप शिबिराचे राबविण्यात आले.
उत्पन्नाचा दाखला, वय, राष्ट्रीयत्व अधिवास दाखला, ज्येष्ठ नागरिकांचा दाखला, स्थानिक वास्तव्याचा दाखला आदी दाखले या शिबिरात नागरिकांना मोफत काढून देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिवा शहर विभागाकडून करण्यात आले होते.कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शिबिराचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला.दिवा पूर्वेकडील मयूर हॉटेल समोरील सुमित हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.