Homeशहर परिसरठाकरेंच्या शिवसेनेने घेतली रेल्वे अधिकाऱ्यांची भेट!

ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली रेल्वे अधिकाऱ्यांची भेट!

दिवा:-ठाकरेंच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख सचिन पाटील यांनी स्टेशनचे रेल्वे अधिकारी व शिवसेना पदाधिकाऱ्यांसह बंद पडलेल्या सरकत्या जिन्याची पाहणी केली.सदर जीना सुरू झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तेथून निघाले अशी माहिती सचिन पाटील यांनी दिली.

दिवा स्टेशन पूर्वेला स्वयंचलित सरकता जिना दुराऱ्याच दिवशी काही तांत्रिक कारणाने बंद पडला.शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांनी यावेळी उप स्टेशन प्रबंधक यांची भेट घेऊन उप स्टेशन प्रबंधक यांच्या सोबत जिन्याच्या येथे पाहणी केली. यावेळी उपशहर प्रमुख सचिन पाटील, युवा सेना दिवा शहर अधिकारी अभिषेक ठाकूर, उपशहर संघटक सौ प्रियांका सावंत, विभाग संघटक स्मिता जाधव, शाखा प्रमुख प्रतीक म्हात्रे, संभाजी जाधव , महेश खेतले, तुषार सावंत आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!