Homeठाणे-मेट्रोठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने दिवा शहरात 'होऊ द्या चर्चा' चौक सभा संपन्न

ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने दिवा शहरात ‘होऊ द्या चर्चा’ चौक सभा संपन्न

दिवा:- ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने दिवा शहरात होऊ द्या चर्चा या उपक्रमा अंतर्गत चौक सभा पार पडली.केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनांची पोलखोल या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली.

सदर कार्यक्रमाला दिवा शहरातील ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. माजी आमदार सुभाष भोईर आणि कल्याण लोकसभेचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.यावेळी
लोकसभा सह संपर्क प्रमुख अरविंद बिरमुळे, प्रतिक पाटील, स्वप्निल पावशे, विधानसभा अधिकारी सुरज जाधव, दिवा उपशहर प्रमुख सचिन पाटील, वैष्णव पाटील, युवा शहर अधिकारी श्री अभिषेक ठाकूर, महिला शहर प्रमुख सौ. योगिता नाईक, महिला शहर संघटिका प्रियांका सावंत, विभाग प्रमुख गुरुनाथ नाईक, राजेश भोईर, चेतन पाटील, मचींद्रा मच्छिद्र लाड, नवनीत पाटील, स्मिता जाधव, विनया कदम, युवा सचिव उमेश राठोड, युवासेना शहर समन्वयक विराज सुर्वे, युवा उप शहर अधिकारी अक्षय म्हात्रे सर्व उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, शिवसेना युवासेना पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.
ग्लोबल स्कूल येथे पार पडलेल्या चौक सभेला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

error: Content is protected !!