दिवा:-दिवा स्टेशनच्या बाजूला असणाऱ्या तलावाच्या दुरवस्थेबाबत भारतीय जनता पार्टीने महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी या तलावाच्या दुरवस्थेचा निषेध करताना तलावाचे श्राद्ध घालत अनोखे आंदोलन केले.
दिवा पूर्वेकडील या तलावाची दुरावस्था झाली असून तलावाच्या सुशोभीकरणासाठी मंजूर झालेला निधी गेला कुठे? असा सवाल भाजपने या आंदोलन दरम्यान विचारला आहे. यावेळी भाजपचे मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, महिला मंडळ अध्यक्ष ज्योती पाटील, ठाणे जिल्हा सचिव विजय भोईर, रेशमा पवार, रोशन भगत, सपना भगत, समीर चव्हाण यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.