दिवा:- घरगुती ट्युशनला तीस मिनिटं उशीर झाला म्हणून इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षिका श्रावणी चव्हाण यांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या रणरागिणीनी जाब विचारत माफी मागायला लावली.
श्रावणी चव्हाण या शिक्षिकेने रश्मी सावंत या आपल्या मुलीला बेदम मारहाण केली अशी
माहिती तिच्या आईने शाखाप्रमुख राज कदम यांना दिली.यानंतर उपशहर प्रमुख सचिन पाटील यांच्या
नेतृत्वाखाली शिवसेनेच्या रणरागिणी उपशहर संघटिका सौ.प्रियंका सावंत,उपविभाग संघटिका सौ.विनया कदम,सौ. दिपाली सावंत
सौ. सावी सुर्वे सौ. आशा रोकडे, सौ.सुजाता मोरे शिवसैनिक,नितीन सावंत,अमित गुप्ता
यांनी जाऊन जाब विचारत संबंधित शिक्षिकेला दिवा पोलीस चौकीत घेऊन गेले.एपीआय शेळके यांनी सदर शिक्षिकेला चांगलेच फैलावर घेतले.सदर शिक्षिकेने सर्वांची माफी मागितली व यापुढे असे कृत्य कधीही करणार नाही असे वचन दिले.ही बाब लक्षात घेऊन मुलीच्या आईने तक्रार नोंदवली नाही असे ठाकरेंच्या शिवसेनेने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.