कल्याण – महाराष्ट्रातील ए.एस.जी रुग्णालयाची ही 7 वी शाखा रॉक माउंट रेसिडंन्सी, खडकपाडा, कल्याण येथे काल सुरु झाली. या ए.एस.जी समूहाची रुग्णालये देशातील 83 शहरात 160 हुन अधिक शाखा कार्यरत आहेत. कल्याण मधील या शाखेमध्ये रुग्णांना एक महिना मोफत ओपीडी सेवा मिळणार आहे. डोळ्यां संदर्भातील अत्याधुनिक यंत्रनेचा वापर करून सुविधा देणारे हे सुसज्ज हॉस्पिटल आहे. कल्याण शहरात अशा हॉस्पिटलची आवश्यकता होती. सर्व तज्ञ डॉक्टरांची टिम उपलब्ध असल्याने रुग्णांना उत्तम उपचार याठिकाणी केले जातील, असे उदघाटन प्रसंगी यांनी म्हटले आहे. या रुग्णालयात मोतीबिंदू, लेसीक, विट्रो रेटिना सर्जरी, आक्युलोप्लास्टी, ग्लुकोमा, कोर्निया, तिरळेपणा, ऑप्थल्मोलॉजी नेत्ररोगाच्या श्रेणीवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणार आहेत. या रुग्णालयात डोळ्यांशी निगडित सर्व जटील शास्त्रक्रिया, निदान आणि उपचार एकाच ठिकाणी नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. ए.एस.जी. डोळ्यांचे रुग्णालय वेळोवेळी मोफत जनजागृती आरोग्य शिबीर आयोजित करणार आहेत. सध्या सर्वच वयोगटातील लोकांचे स्क्रीनटाईमस अधिक असल्याने डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत. याकरिता सातत्याने शाळा, महाविद्यालय तसेच संस्था, संघटना याठिकाणी डोळ्यांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. वर्षातून प्रत्येकाने किमान 2 वेळा तरी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
सन 2005 मध्ये डॉक्टर अरुण सिंघवी आणि डॉक्टर शिल्पी गांग या एम्स मधील दोन अनुभवी व्यक्तींनी ए.एस.जी. आय समूहाची महुर्तमेढ रोवली. प्रत्येकाला जगातील सर्वोत्तम सुविधा देण्याबाबत कोणताही भेदभाव न करता समान उपचार पद्धती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एएसजी समूहाची स्थापना करण्यात आली. ए.एस.जी. आय समूहाला आजवर अचिव्हर्स 2009, उत्कृष्ट सेवेसाठी वेलनेस 2010, राजीव गांधी गोड मेडल 2014 आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ए.एस.जी नेत्र रुग्णालयात चार अनुभवी आणि वरिष्ठ डॉक्टरांची टिम काम कार्यरत असणार आहे. ज्यामध्ये डॉक्टर नितेश साळूंखे, डॉक्टर रोहित मेंडके, डॉक्टर मानस देशमुख आणि डॉक्टर हरीष पाठक यांचा समावेश आहे.