Homeठाणे-मेट्रोदिवा-मुंब्रा शहर पत्रकार संघाचे पदाधिकारी जाहीर

दिवा-मुंब्रा शहर पत्रकार संघाचे पदाधिकारी जाहीर

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुहास खंडागळे, उपाध्यक्षपदी विरेंद्र शुक्ला,सेक्रेटरीपदी युसुफ पुरी तर ऍड खलील गिरकर यांची कायदेविषयक सल्लागार म्हणून निवड

दिवा:- दिवा मुंब्रा शहरातील पत्रकारांच्या समस्या मांडण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ असावे या उद्देशाने स्थापन झालेल्या दिवा-मुंब्रा शहर पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

या पत्रकार संघात एकूण 11 जणांची कार्यकारणी आहे.दिवा-मुंब्रा शहरातील पत्रकारांना त्यांच्या प्रश्नांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने दोन्ही शहरातील पत्रकारांनी एकत्र येत दिवा-मुंब्रा शहर पत्रकार संघाची स्थापना केली आहे. या पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून सुहास खंडागळे, उपाध्यक्ष म्हणून शुक्ला तर सचिव म्हणून युसूफ पुरी यांची निवड करण्यात आली आहे.पत्रकार ऍड.खलील गिरकर यांची कायदेविषयक सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली असून अन्य सदस्यांवर लवकरच जबाबदारी दिली जाणार असल्याचे पत्रकार संघाचे सेक्रेटरी युसुफ पुरी यांनी सांगितले आहे.

पत्रकार संघाच्या मुख्य कार्यकारणी मध्ये उदयभान पांडे,प्रणिता घवाले,सुदेश सकपाळ,सारा पुरी,सुनिल उघडे,अरुणा जाधव,विनीत तिवारी यांची निवड करण्यात आली आहे.दिवा-मुंब्रा शहर पत्रकार संघाचे नवे सदस्य होण्यासाठी संघाचे सचिव किंवा अन्य कोणत्याही सदस्यांशी संपर्क साधावा असे आवाहन पत्रकार संघाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!