दिवा:- तन्वी फाउंडेशनच्या वतीने अध्यक्षा सौ.ज्योती राजकांत पाटील यांनी गुरुवारी नारीशक्ती आराधना महाआरतीचे आयोजन केले होते.यावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बी आर नगर नाका येथील संदीप दादा दि ग्रेट मंडळाच्या नवरात्री उत्सवात गुरुवारी ज्योती पाटील यांच्या वतीने शेकडो महिलांच्या उपस्थितीत नारीशक्ती आराधना महाआरती मोठ्या उत्साहात पार पडली.यावेळी बी आर नगर भागातील असंख्य महिला महाआरती साठी उपस्थित होत्या.






