Homeठाणे-मेट्रोनिलेश पाटील व अर्चना पाटील यांच्याकडून किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन

निलेश पाटील व अर्चना पाटील यांच्याकडून किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन

दिवा:- निलेश पाटील व अर्चना पाटील यांच्या माध्यमातून दिवा शहरात भव्य किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून नाव नोंदणीचे अर्ज निलेश पाटील यांच्या शिवसेना कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. नाव नोंदणी करताना समूहाचे नाव, पत्ता तसेच मोबाईल नंबर देणे गरजेचे असल्याचे आयोजक यांनी म्हटले आहे. निलेश पाटील यांच्या वतीने दिवा शहरात विविध उपक्रम राबवून सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात असतो.किल्ले संवर्धन व इतिहासाचे जतन हा उद्देश लक्षात ठेवून निलेश पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत प्रथम विजेत्यांना रोख रुपये 11000,द्वितीय विजेत्यांना रोख रक्कम 7000 व तृतीय क्रमांकाला रोख रक्कम 5 हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार असल्याची माहिती आयोजक निलेश पाटील व अर्चना पाटील यांनी दिली आहे.

error: Content is protected !!