दिवा:-सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते विकास इंगळे यांनी दिव्यातील शाळा व पोलीस यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त संविधान भेट देण्याचा अनोखा उपक्रम राबवला.
लोकशाही अधिक समृद्ध व्हावी हा संकल्प घेऊन सामाजिक कार्यकर्ते विकास इंगळे यांनी संविधानाची प्रत भेट देण्याचा उपक्रम दिवा शहरात प्रतीकात्मक स्वरूपात राबवला. यामध्ये त्यांनी दिवा शहरातील काही शाळा,दिवा शहरातील पोलीस चौकी येथील पोलीस कर्मचारी व शिक्षकांना संविधानाची प्रत भेट दिली. लोकशाही सक्षम होण्याच्या प्रक्रियेत सर्व नागरिकांनी पुढाकार घ्यावा हा संकल्प स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने केला पाहिजे असे विकास इंगळे यांनी यावेळी म्हटले. यावेळी विकास इंगळे यांच्यासोबत नागेश पवार,सुनीता परमार हे उपस्थित होते.






