ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात, तातडीचे आणि अत्यंत महत्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे असल्याने सोमवार, १७/०३/२०२५ रोजी रात्री १२.०० पासून ते मंगळवार १८/०३/२०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे, त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा आणि दिवा या परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.