Homeठाणे-मेट्रोदिव्यातील फेरीवाल्यांमुळे नागरीक हैराण, भाजप करणार रस्ता रोको आंदोलन

दिव्यातील फेरीवाल्यांमुळे नागरीक हैराण, भाजप करणार रस्ता रोको आंदोलन

दिवा:-दिवा शहरातील फेरीवाल्यां विरोधात भारतीय जनता पार्टी दिवा शहर आक्रमक आंदोलन घेणार आहे.येणाऱ्या काही दिवसात शहरातील फेरीवाले न हटवल्यास शनिवारी रास्ता रोको करण्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.तशी माहिती भाजपच्या वतीने विजय भोईर यांनी दिली आहे.

शहरातील फेरीवाल्यांच्या गंभीर समस्येवर महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात व शहरातील रस्ते नागरिकांसाठी मोकळे करावेत या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी दिवा शहर आक्रमक झाल्याने ठाणे महानगरपालिका प्रशासनाची अडचण होणार आहे.शहरातील सर्व प्रमुख रस्ते फेरीवाल्यांनी अडवल्याने सर्वसामान्य नागरिकांना चालण्यासाठी त्रास होतो.फुटपाथ व रस्ते फेरीवाल्यांनी काबीज केले आहेत. रस्त्याने चालायला जागा नसल्याने नागरिकांचे अपघात होत असतात. अनेक फेरीवाल्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिला जातो. परिणामी नागरिकांच्या संरक्षणासाठी फेरीवाले हटाव मोहीम भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे सचिव विजय भोईर यांनी या आधीच दिली आहे.भारतीय जनता पार्टी दिवा शहरच्या वतीने मंडळ अध्यक्ष सचिन भोईर व सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येणार असून रास्ता रोको करून या गंभीर प्रश्नाला वाचा फोडली जाणार असल्याची माहिती भाजपच्या वतीने विजय भोईर यांनी दिली आहे.

error: Content is protected !!