Homeठाणे-मेट्रोठाण्यात शिवसेना आक्रमक; शेतकऱ्याला भरीव मदत मिळावी यासाठी जोरदार आंदोलन

ठाण्यात शिवसेना आक्रमक; शेतकऱ्याला भरीव मदत मिळावी यासाठी जोरदार आंदोलन

ठाणे : – गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे मराठवाडा, सोलापूर यासारख्या अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामध्ये शेतकरी संकटात सापडला असून या शेतकऱ्यांना अद्याप मदत पोहचली नाही. शेत आणि घरसंसार उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला भरीव मदत देण्यात यावी अशी सातत्याने मागणी होत असतानाही सरकारकडून फसव्या घोषणा आणि आकड्यांचा खेळ सुरू झाला आहे. त्याच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारले. शेतकऱ्याना तत्काळ मदत मिळावी यासाठी ठाण्यात शिवसेनेने जोरदार आंदोलन केले. शिवसेना नेते राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांवर आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आले. “पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळालीच पाहिजे”…. मंत्री तुपाशी, लाडका शेतकरी उपाशी….”पीक, जमीन गेली वाहून, सरकार गेले पळून”…. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे”…. अशा आशयाचे फलक हातात घेऊन शिवसैनिकांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. पूरग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे डोळे कधी उघडणार, शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मदत कधी करणार असा सवाल यावेळी संतप्त शिवसैनिकांनी उपस्थित केला.

यावेळी संपर्कप्रमुख नरेश मनेरा , गुरुनाथ खोत, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे , नवी मुंबई जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे, प्रकाश पाटील, भिवंडी जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, संपर्कप्रमुख एम के मढवी ,दिवा संपर्कप्रमुख रोहिदास मुंडे ,महिला जिल्हा संघटक रेखाताई खोपकर, रंजना शिंत्रे, विभाग संघटक समन्वयक नीलिमा शिंदे,कळवा मुंब्रा विधानसभा शहर संघटिका पुष्पालता भानुषाली, कळवा समन्वयक माजी नगरसेविका नीलिमा ताई शिंदे, ठाणे उपजिल्हाप्रमुख कृष्णकांत कोळी, सुनील पाटील, कल्याण उपजिल्हाप्रमुख विजय देसाई , प्रदीप शिंदे,समन्वयक संजय तरे,ठाणे शहर प्रमुख अनिश गाढवे ,दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, मुंब्रा शहर प्रमुख विजय कदम ,ठाणे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण ,वसंत गव्हाळे ,परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक, विधानसभा संघटक चंद्रकांत विधाते , प्रमिलाताई भांगे , आकांक्षा राणे ,नगरसेवक मंदार विचारे, तसेच सर्व पदाधिकारी सर्व विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख व इतर शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एक मंत्री स्वतःला शेतकरी म्हणवतो आणि कल्याणला जायचे असेल तर हेलिकॉप्टर मधून फिरतो – राजन विचारे

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेने आंदोलन पुकारले आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे. हेक्टरी ५० हजार शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यांना हक्कांचे पैसे मिळाले पाहिजे. ठाण्याचे एक मंत्री स्वतःला शेतकरी म्हणवतो आणि कल्याण ला जायचे असेल तर हेलिकॉप्टर मधून फिरतो. त्या मंत्र्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आथिर्क मदत द्यावी करावी अशी मागणी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी केली

error: Content is protected !!