ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतील माजिवडा जंक्शन येथे मुख्य जलवाहिनी मधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे, परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून सदरची गळती तातडीने बंद करणे आवश्यक आहे. या कामासाठी शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9.00 ते रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 सकाळी 9.00 वाजेपर्यत एकूण 24 तास ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर, रघुकुल, पारसिक नगर, आतकोनेश्वर नगर परिसर, पौंड पाडा, आतकोनेश्वर, खारेगाव, कळवा, मनिषानगर, क्रांतीनगर, साकेत कॉम्प्लेक्स, महागिरी, खारटन रोड, सिडको बसस्टॉप परिसर, कोपरी कोळीवाडा,पंचगंगा, राबोडी 1 व 2, आकाशगंगा, बाळकुम, राम मारुती नगर, लोढा अमारा, कल्पतरु, ब्रह्मांड, रुतु सिटी, गोकुळनगर, आझादनगर, मसनवाडा, रुतु पार्क परिसर, लोकमान्य नगर, इंदिरानगर, सावरकर नगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, रामनगर, कैलासनगर, जुना गांव, किसननगर, भटवाडी, श्रीनगर, शांतीनगर, रुपादेवी पाडा, ज्ञानेश्वरनगर परिसर, किसननगर नं. 3 परिसर, काकडे चाळ, कांदबरी सोसायटी, लोकदर्शन सोसायटी, परेरानगर, सुदर्शन कॉलनी परिसर, आझादनगर, गोकुळनगर, जेलटाकी परिसर, पोलीस लाईन, खारकारआळी, जरीमरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, आंबेडकरनगर, गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, वसंतविहार, लोकपुरम, लोकउपवन, देवदयानगर परिसर, कोकणी पाडा, वराडवाडी, शिवाईनगर, गावंडबाग, नीळकंठ, शास्त्रीनगर नं. 1 व 2, लक्ष्मीबाग, विहंगपार्क, मैत्रीपार्क, सिध्दांचल कॉम्प्लेक्स, वसंत विहार म्हाडा, वसंतविहार, माजिवडा, मानपाडा, कोठारी कंपाऊंड, ढोकाळी, मनोरमानगर, रुणवाल, डोंगरपाडा, विजयनगर, विजयपार्क, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, वर्तकनगरपरिसर, चिरागनगर, लोकमान्यनगर पाडा नं. 1, दोस्ती कॉम्प्लेक्स, वेदांत कॉम्प्लेक्स, कोरस नक्षत्र, रुणवॉल कॉम्प्लेक्स परिसर, लोकमान्नगर पाडा नं. 2, शास्त्रीनगर नं. 2, आर्य क्रिडा मंडळ, क्रोम पार्क, मोरेवाडी, समतानगर, वर्तकनगर, भीमनगर परिसर, ज्ञानेश्वर नगर, महात्मा फुलेनगर, गंगाधर नगर, वैतीवाडी, सिध्देश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई, मावळीमंडळ, कोलबाड, गोकुळनगर, आझादनगर, खोपट, सिव्हील हॉस्पिटल परिसर, आंबेडकर रोड परिसर, मनोरुग्णालय परिसर, शिवाजीनगर, रघुनाथनगर, डिसोझावाडी, कशीश पार्क, रहेजा गार्डन, ग्रीष्मा सोसायटी, धर्मवीर नगर, परबवाडी, इटर्निटी कॉम्प्लेक्स, विष्णुनगर, भास्कर कॉलनी, ब्राह्मण सोसायटी, घंटाळी, राम मारुती रोड, साठेवाडी, वागळे एमआयडीसी परिसर, केणीनगर, नेहरुनगर, किसननगर नं. 2 इत्यादी भागांचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे.
सदर पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, सदर कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.






